25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

बहुजन जनता दलाच्या वतीने डॉक्टराचा सन्मान.

बहुजन जनता दलाच्या वतीने डॉक्टरांना सन्मानित

_____________________

मेडिव्हिजन सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट दिलेल्या सेवेमुळे रुग्णांचे झालेले समाधान हीच खरी रुग्णसेवा. डॉ डेनियल प्रसाद

_____________________

पुणे दि स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी मित्र मंडळ चौकातील पाटील प्लाझा बिल्डिंग येथील मेडिव्हिजन (एम आर आय आणि सिटीस्कॅन) सेंटरचे संचालक आणि मॅनेजर डायरेक्टर डॉ डेनियल प्रसाद डॉ माधव दामले डॉ मनोज वेद यांनी मेडिव्हिजन सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णांची उत्कृष्टपणे सेवा दिल्यामुळे त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी डॉ डेनियल प्रसाद डॉ माधव दामले डॉ मनोज वेद यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन त्यांना सन्मानित केले.

मेडिव्हिजन सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट दिलेल्या सेवेमुळे रुग्णांचे आणि सामान्य नागरिकांचे झालेले समाधान हीच खरी रुग्णसेवा असल्याचे मत मेडिव्हिजन सेंटरचे संचालक आणि मॅनेजर डायरेक्टर असलेले डॉ डेनियल प्रसाद यांनी व्यक्त केले. पुणे शहराच्या मध्यभागी येत असलेल्या स्वारगेट येथून जवळच असलेल्या सारसबाग रोडवरील मित्र मंडळ चौक येथील पाटील बिल्डिंग येथे पुणे शहरातील सर्वात जुने आणि पुणे येथील सर्वप्रथम सुरू करण्यात आलेले मेडिव्हिजन सेंटर असून मेडिव्हिजन सेंटरचे नाव पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासह सांगली सातारा कोल्हापूर रायगड अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मेडिकल व्यवसायामध्ये प्रथम क्रमांकाचे नाव आहे. मेडिव्हिजन सेंटर येथे एमआरआय आणि सिटीस्कॅन यांच्यासह विविध रुग्णांना झालेल्या आजारांच्या तपासण्या उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे तपासण्या करण्यात येत असल्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्ण आणि सामान्य नागरिक मेडिव्हिजन सेंटर येथे मोठ्या विश्वासाने विविध तपासण्या करण्यासाठी येत असल्यामुळे डिव्हिजन सेंटरचे संचालक आणि मॅनेजर डायरेक्टर डॉ डेनियल प्रसाद आणि त्यांचे सहकारी व कर्मचारी येणाऱ्या रुग्णांच्या विविध तपासण्या करून त्यांचे उत्कृष्ट व उत्तम पद्धतीचे रिपोर्टिंग करून देत असल्यामुळे येणाऱ्या रुग्णांचे आणि सामान्य नागरिकांचे समाधान होत असल्यामुळे मेडिव्हिजन सेंटरचे संचालक आणि मॅनेजर डायरेक्टर डॉ डेनियल प्रसाद यांनी मेडिव्हिजन सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट दिलेल्या सेवेमुळे रुग्णांचे आणि सामान्य नागरिकांचे झालेले समाधान हीच खरी रुग्णसेवा असल्याचे मत व्यक्त केले ते बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना मेडिव्हिजन सेंटरच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ऋषिकेश मुंडे पिरमिया सय्यद किशोर कसबे अजित टाइपिस्ट राम रगडे अजित अब्राहम राहुल तडसरे अनिल दोडके सुरेखा मॅडम शहजान शेख सिद्धी बागडे अनुजा मुजुमदार ‌आरती शर्मा रेश्मा मुळे श्रद्धा राय सुनिता मावशी यांच्यासह अनेक मेडिव्हिजन सेंटरचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी कळविले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या