16.4 C
New York
Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

चेक न वाटल्या प्रकरणी आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व सातलाख पन्नास हजार रुपये दंड

चेक न वाटल्या प्रकरणी आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व सातलाख पन्नास हजार रुपये दंड

माजलगाव प्रतिनिधी
फिर्यादी अप्पा इंद्रजीत गवते रा. गोविंदपूर ता. माजलगाव जिल्हा बीड यांचेकडून आरोपी यशवंत सीडस अँड फर्टिलाईजर माजलगावचे मालक कल्याण त्रिंबकराव गवते यांनी सहा महिन्याकरिता सात लाख रुपये हातउसने घेतले होते .सहा महिन्यानंतर अप्पा इंद्रजीत गवते यांनी कल्याण त्रिंबकराव गवते यांना दिलेले सातलाख रुपे परत मागितले असता आरोपी कल्याण त्रिंबकराव गवते यांनी कल्याण त्रिंबकराव गवते प्रो. प्रा यशवंत सीडस अँड फर्टिलायझर माजलगावचे नावे खाते असलेला दि.वैद्यनाथ अर्बन को.ऑफ.बँक. ली. शाखा माजलगाव येथील खाते न 231/845 चा धनादेश नंबर 740025 हा फिर्यादीस रक्कम टाकून त्याची सही करून दिनांक 24/9/2018 रोजी दिला व चेक जमा करून तुमचे रक्कम उचलून घ्या असे म्हणाला.
आरोपी कल्याण त्रिंबकराव गवते यांनी फिर्यादी अप्पा इंद्रजीत गवते यांना दिनांक 24/9/2018 रोजी दिलेला धनादेश त्याचे खाते असलेल्या मराठवाडा अर्बन . को.ऑफ. क्रेडिट सोसायटी माजलगाव येथील खात्यावर दिनांक 4/10/2018 रोजी जमा केला असता मराठवाडा क्रेडिट सोसायटी माजलगाव यांनी सदर धनादेश त्यांचे खाते असलेल्या महेश अर्बन को ऑफ. बँक शाखा माजलगाव येथे जमा केला असता त्यानंतर महेश अर्बन बँक शाखा माजलगाव सदरचा धनादेश
वटविण्यासाठी आरोपीचे खाते असलेल्या बँकेत पाठवला असता आरोपीचे खातेवर अपुरी निधी असल्याने चेक न वाटता फिर्यादीस महेश अर्बन बँक शखा माजलगाव यांनी दिनांक 4/10/2018 रोजी मेमो व धनादेश परत दिला असता फिर्यादीने आरोपीस कायदेशीर नोटीस पाठून धनादेशावरील रकमेची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीस नोटीसचे मुदतीमध्ये धनादेशावरील रक्कम न दिल्याने फिर्यादी आप्पा इंद्रजीत गवते यांनी मा. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी साहेब माजलगाव यांच्या न्यायालयात कलम 138 एन. आय ऍक्ट अन्वय फिर्याद दाखल केली होती
सदरचे प्रकरणात फिर्यादीचे साक्ष नोंदवण्यात आली व आरोपीची देखील साक्ष नोंदवण्यात आली आरोपीचे वतीन सदरचा धनादेश फिर्यादीने चोरून नेला,आरोपीला नोटीस मिळाली नाही ,आरोपीला सातलाख रुपये देण्याची फिर्यादीची ऐपत नाही व सदर धनादेश आरोपीचा नाही असे बचाव घेण्यात आले परंतु फिर्यादीने दाखल केलेले कागदपत्रे व फिर्यादीचे वतीने केलेला कायदेशीर अंतिम युक्तिवाद गृहीत धरून दिनांक 5/5/2025 रोजी मा.प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी साहेब माजलगाव यांनी यशवंत सीडस अँड फर्टिलायझर माजलगाव चे मालक आरोपी कल्याण त्रिंबकराव गवते यांना सातलाख पन्नास हजार रुपये दंड व एकवर्ष साध्या कारावासाची शिक्षा दिली .
फिर्यादीचे वतीने अँड . व्हि. बी लवटे यांचे मार्गदर्शनाखाली अँड आर.के गवते यांनी काम पाहिले व त्यांना अँड एन .आर.जावळे यांनी सहकार्य केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या