◾विकसित असलेल्या पाचेगाव तंड्याची जाणीवपूर्वक बदनामी; याचा खरा मास्टरमाईंड कोण शोध घेणे गरजेचे?
◾मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या काही माथेफिरूने केली चर्चा?
गेवराई, महाराष्ट्र आरंभ न्यूज : गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील तांड्यावर जवळपास ३० ते ४० लोक हे किन्नर टाईप मध्ये आढळून आल्याची चर्चा गेवराई तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे. परंतु याची माहिती सखोल घेतली असता ही पूर्ण अफवा असल्याची माहिती मिळाली आहे. जाणीवपूर्वक दारूच्या नशेत ही अफवा पसरवून तांड्याची बदनामी केली आहे. परंतु यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे तेथील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत गेवराई तालुक्यात एकच चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. अफवा पसरवून तांड्याची बदनामी करणाऱ्यांचा पोलीस प्रशासनानी शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच या पाठीमागचा खरा मास्टरमाईंड कोण आहे. याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे.
गेवराई तालुक्यात विकसित असलेल्या पाचेगाव तंड्याची जाणीवपूर्वक बदनामी केली का? असा सवाल तेथील नागरिकांकडून केला जात आहे. पाचेगाव मध्ये काही समाजकंटकांकडून या गावात काहीतरी गैरप्रकार झालाय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू केली होती मात्र त्या चर्चेचे रूपांतर बीड जिल्ह्यात पसरले आहे ग्रामीण भागासारख्या गाव गाड्या वरच्या तंड्यावर या चर्चेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होतें पाचेगाव सार्वधिक लोकसंख्येचे गाव आहे या गावात याआधी घडलेल्या समाजप्रती घटनेमुळे आधीच चर्चेला वेग आला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने या गावात विनाकारण अफवा पसरविण्याचे काम काही माथेफिरू तरुणांनी केले आहे. या गावात गुण्यागोविंदाने राहणारा सर्व जाती धर्मातील समाज बांधव असल्याने हे गाव सातत्याने विविध कामात सक्रियतेच्या माध्यमातून लोकप्रिय आहे. गेल्या काही तासापासून तंड्याची बदनामी करणाऱ्या निष्क्रिय लोकांना खाकीच्या माध्यमातून दणका दाखवायला हवा कारण या अफवेमुळे या भागातील लहान लेकरापासून ते वयोवृद्ध लोक अतिशय घाबरून गेल्याने चिंता वाटण्यासारखे प्रकार प्रत्येकाच्या मनात व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळाले याबाबत ३० ते ४० किन्नर आढळून आल्याची चर्चा ही पोकळ अफवा असून याकडे नागरिकांनी लक्ष्य न देता गाव तांडा सुरक्षित आहे. असे समजून चर्चा करणाऱ्या निष्क्रिय लोकांवर गेवराई तालुका पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.