16.4 C
New York
Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजलगाव येथे डोक्यात दगडाने मारून गंभीर दुखापत केल्याचे प्रकरणात आरोपीस जमीन मंजूर

  1. माजलगाव येथे डोक्यात दगडाने मारून गंभीर दुखापत केल्याचे प्रकरणात आरोपीस जमीन मंजूर

माजलगाव प्रतिनिधी

दिनांक 23/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादी गावाकडून माजलगाव येऊन परत गावी जाताना सिंधफणा पुलाजवळ थांबला तेव्हा 11.45 चे सुमारास बायपासकडून एक तीन सीटर रिक्षा आल्याने मी त्यास हात करून थांबवून त्यात बसलो त्यास मी लऊळ येथे नेऊन सोड तुला शंभर रुपये देतो तर रिक्षा गजानन हॉटेलसमोर थांबला रिक्षा चालकाने मला अगोदर शंभर रुपये दे असे म्हणाला तेव्हा मी त्यास गावाकडे सोड त्यानंतर मी तुला रिक्षाचे भाडे देईन या वरून त्या रिक्षावाल्याने मला रिक्षाचे खाली उतरण्यास सांगितले.तेव्हा त्या रिक्षावाल्याने मला चापट. मारल्या तेव्हा माझे डोळ्याचा चष्मा खाली पडून फुटला.तेव्हा गजानन हॉटेलचे मालक प्रल्हाद विघ्ने हे तेथे आले व त्यांनी मला व रिक्षा चालकाला समजून सांगितले व भांडणाची सोडवा सोडव केली.त्यानंतर मी तेथून पाई गोविंद मोटर्स ट्रॅक्टर एजन्सी परभणी फाटा समोर थांबलो असताना दुपारी 12.00चे सुमारास रिक्षा चालकाने रिक्षा थांबून मला लाथ मारून खाली पाडले व हातातील दगडाने माझे डोक्यावर डावे बाजूस मारून गंभीर जखमी केले अशा फिर्यादीवरून दिनांक 24/42024 रोजी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगाव येथे कलम 118(2)115(2)352 बी.एन.एस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता

त्यानंतर आरोपी विकी अंबादास सानप यास ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव यांनी दिनांक 25/4/2025 रोजी अटक केली होती त्यानंतर आरोपीचे वतीने मा प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी साहेब माजलगाव यांच्या न्यायालयात अँड आर के गवते यांचे मार्फत जमीन अर्ज दाखल केला होता. दिनांक 29/4/2025 रोजी सरकारी पक्षाच्या वतीने सदरचे प्रकरण हे अत्यात गंभीर स्वरूपाचे असून आरोपीस जमीन दिल्यास कायद्याचा धाक राहणार नाही ,तसेच फिर्यादी हा डिस्चार्ज झालेला नसून संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून तो खूप सिरियस आहे त्यामुळेआरोपीस जमीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद करून जमीन अर्जावर आक्षेप घेतला ,परंतु आरोपीचे वतीने दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकांकरून व आरोपीचे वतीने केलेला कायदेशी युक्तिवाद गृहीत धरून आरोपीस मा. नायलयाने दिनांक29/4/2025/ रोजी जामीन मंजूर केला. आरोपीचे वतीने अँड व्हि .बी. लवटे यांचे मार्गदर्शनाखाली अँड आर.के .गवते यांनी काम पाहिले असून त्यांना अँड एस.बी कुलकर्णी , अँड एन.आर जावळे यांनी सहकार्य केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या