5 ते 6 लाखांचे सोलर पॅनल टाकूनही पुरूषोत्तमपुरी येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाल. ग्रामसेवक कोकाटे व प्रशासक केशोड यांनी बोगस सोलर पॅनल टाकून केलेला लाखो रूपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर.
5 ते 6 लाखांचे सोलर पॅनल टाकूनही पुरूषोत्तमपुरी येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाल.
ग्रामसेवक कोकाटे व प्रशासक केशोड यांनी बोगस सोलर पॅनल टाकून केलेला लाखो रूपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर.
माजलगांव, सुनिल थोरात
तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी पाच ते सहा लाखांचे सोलर पॅनल टाकून सुद्धा नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
या गावामध्ये लाईटचा सप्लाय कमी दाबाने होत असल्यामुळे लाईटवर मोटर चालत नाहीत असे ग्रामसेवक चे म्हणणे आहे. सोलर पॅनल कशाला टाकले आहेत नुसते शोपीस म्हणून टाकले आहेत का? या ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शासनाकडे लाखो रुपयांच्या कामाची मागणी केली आणि शासनाने ती पूर्णही केली पण या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला त्यामुळे याच्या झळा पुरुषोत्तमपुरी येथील नागरिकांना बसत आहेत. यामध्ये अनेक वेळा नागरिकांनी पाण्यासाठी यांच्याकडे तक्रारी पण केल्या आहेत. पण यांना काहीच फरक पडत नाही यांनी सहा महिन्यापूर्वीच पाच ते सहा लाखांचे सोलर पॅनलचे काम दाखवले आहे पण आता त्या सोलर पॅनल चा काहीच उपयोग होत नाही असे सांगतात पण ते सोलर पॅनल यांनी टाकले कशाला का फक्त बिल उचलून खिशात घालण्यासाठी टाकलेले आहेत . ग्रामसेवक कोकाटे व प्रशासक केशोड यांनी बोगस सोलर पॅनल टाकून केलेला लाखो रूपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावामध्ये कामे करण्यासाठी हे स्वतःच गुत्तेदार होतात व बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे करून बिले उचलतात यामुळे यांचा भ्रष्टाचार परत एकदा उघडकीस आलेला आहे. बीडीओ मुळूक यांच्याकडे अनेक तक्रारी करूनही यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यामुळे मुळुक यांच्याकडून यांची पाठराखण का होत आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी केलेला आहे.