उपमुख्यमंञी मा.ना.अजितदादा पवार यांच्या निर्धार सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.प्रा.गोपाळ धांडे
============
बीड दि.२६ (प्रतिनिधी)
शिवछञपतीचा आशिर्वाद चला देऊ दादा,भैय्या,भाऊला साथ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज बीड शहरात येत असून त्यांच्या निर्धार सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.गोपाळ धांडे यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रा.धांडे पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आजची निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ना. अजितदादा मार्गदर्शन करणार मोठे निर्णय घेणार आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आजच्या सभेची आम्ही तयारी केली आहे. आजच्या सभेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ना. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निर्धार सभेसाठी हजारों शिक्षक ब॔धु-भगिणीसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.गोपाळ धांडे यांनी केले आहे.🙏👏✌️👍