0.8 C
New York
Saturday, February 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत आढळून आला एका यूवकाचा संशयास्पद मृतदेह; पाेलिसांचा तपास सुरू

 

गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल चावार्क पाठीमागील एका पुलाजवळ संजयनगर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. संभाजी हरीभाऊ गायकवाड (वय.३६ संजय नगर, ता. गेवराई, जि.बीड) असे मृत युवकाचे नाव आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चावार्क च्या पाठीमागील पुलाजवळ सिमेंट रस्त्यालगत युवकाचा मृतदेह नागरिकांना दिसून आला.या घटनेची माहीती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळावर दाखल झाले.

मृतदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरील युवकाचा घात की अपघात शवविच्छेदन अवहाल आल्यानंतर आणि तपासानंतर खरा प्रकार उघडकीस येईल असे गेवराई पोलिसांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या