10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! मोटार सायकल चोरी करणारी टोळी केली जेरबंद

◼️तब्बल दहा मोटारसायकली जप्त करुन आठ गुन्हे आणले उघडकीस

 

गेवराई (महाराष्ट्र आरंभ) प्रतिनिधी : मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आदेश दिलेले आहे. त्याअनुषंगाने दि.20/07/2024 रोजी पोलीस पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकूटे यांना गोपनिय माहिती मिळाली की, दोन इसम चोरीची स्कुटी घेवून बार्शी नाका येथे विकणेकामी येणार आहे. त्यावरुन लागलीच पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांनी बातमीचे अनुषंगाने जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकूटे व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी बार्शीनाका या ठिकाणी सापळा लावला. सापळयामध्ये दोन चारटे पळुन जातांना शिताफिने पकडले. त्यांचेकडुन पेठ बीड ह्दीमध्ये डिसेंबर 2023 मध्ये चोरीस गेलेली बुर्गमन कंपनीची स्कुटी ताब्यात मिळून आली, ती पोलीसांनी जप्त् केली. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) सचिन रामनाथ अंबुरे रा.चिंचवण ता.वडवणी, जि.बीड , 2) शेख नुर लाला रा.चिंचवण ता.वडवणी ,जि.बीड असे सांगितले. पोलीसांनी या दोन आरोपींकडे बारकाईने सखोल चौकशी केल्यावर त्यांचेसोबत रनवीर तोंडे ता. अंबेवडगाव ता.धारुर अशा निघांनी मिळून 10 मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीसांनी त्यांचेकडुन एकुण 10 चोरलेल्या मोटार सायकली जप्त केलेल्या आहेत. यातील तीसरा आरोपी रनवीर तोंडे फरार झालेला आहे, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सदर आरोपीतांकडुन एकुण 10 चोरीच्या मोटार सायकली जप्त केलेल्या आहेत. त्यापैकी 08 गुन्हे उघडकीस आणले एकुण 6 लाख 80 हजार रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे.

1 पो.स्टे.पेठ बीड 320/2023 क.379 भादंवि

2 पो.स्टे.धारुर गुरनं 12/2024 क.379,

3 पो.स्टे.माजलगाव शहर गुरनं 175/2022 क.379

4 पो.स्टे.कोतवाली( जि.परभणी) गुरनं 70/2024 क.379 भादंवि

5 पो.स्टे.विवेकानंदा (जि.लातुर) गुरनं 264/2024 क.379 भादंवि

6 पो.स्टे.लोणीकंद (पुणे शहर) गुरनं 179/2024 क.379 भादंवि

7 पो.स्टे.पाटोदा गुरनं 193/2024 कलम 379

8 पो.स्टे.अंबाजोगाई ग्रामीण गुरनं 216/2024 कलम 379

इतर जप्त केलेल्या दोन गाडयांच्या मालकी हक्काबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपीकडुन इतरही मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. दोन आरोपीं व मोटार सायकल मुद्येमाल पुढील तपासकामी पो.स्टे.पेठ बीड यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकूटे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह/पी.टी.चव्हाण, विकास राठोड, राहुल शिंदे, देविदास जमदाडे, बाळु सानप, विकी सुरवसे, चालक नामदेव उगले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या