आदरणीय पोलीस अधीक्षक जिल्हा बीड नंदकुमार ठाकूर साहेब यांनी बीड जिल्ह्यातील कार्यरत असलेली मोटर सायकल वाहन चोरांची आंतरराज्य अंतर जिल्हा टोळी पकडून एकूण 16 गुन्हे उघड करून २२ मोटरसायकल जप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बीड जिल्हा पोलिसची शान म्हणून अनेक पोलिस कर्मचारी याचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गारग पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांनी काढत पोलिस कर्मचारी याचं कौतुक केले यावेळी अशोक दुबाले यांचा सन्मान केला. तो सन्मान आपले वडील अर्जूनराव दुबाले याच्या कडून पोलिस दलातील काम करण्याची प्रेरणा ऊर्जा मिळाली हा माझा सन्मान माझ्या वडिलांना अपर्ण करून स्विकरला असं हि अशोक दुबाले म्हणाले. यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पाडकर, मित्र परिवार, बीड जिल्हा पोलिस कर्मचारी सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.