20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

सम्राट रावण मस्के ने वोपा व्ही स्कूल आॅनलाईन शिक्षणाच्या वापरामध्ये जिल्हायातून सर्व प्रथम

सम्राट रावण मस्के ने वोपा व्ही स्कूल ऑनलाईन शिक्षणाच्या वापरामध्ये जिल्ह्यातून सर्वप्रथम

 

बीड दि.१८ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर (म) मध्ये विद्यार्थ्यांना वोपा व्ही- स्कूल चे मोफत ऑनलाईन शिक्षण दिले जाते. या शाळेतील सम्राट रावण मस्के हा ३ री च्या वर्गात शिकत असून त्याने वोपा व्ही स्कूल ऑनलाईन शिक्षणाचा सर्वाधिक वापर करून बीड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

 

विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता महागड्या ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय परवडणारे नाहीत. हीच गरज ओळखून ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन’ (वोपा) या संस्थेने अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व्ही स्कूलचा उपक्रम सुरु केला आहे. व्ही-स्कूल ॲप वापरण्यासाठी शासनाने सुद्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत व इतर वेगवेगळया शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत. या ॲप चा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी शासनाचा भर दिसून येत आहे. या ॲप मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला हे शिक्षकांना याची नोंद ठेवता येते. शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील या ॲप चा मोठ्या प्रमाणात वापर करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची नोंद ठेवता येते. या शाळेतील सम्राट रावण मस्के हा ३ री च्या वर्गात शिक्षण घेत असून त्याने वोपा व्ही- स्कूल या डिजिटल ऑनलाईन शिक्षणाचा सर्वाधिक वापर करून बीड जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.त्याच्या या यशाबद्दल वोपा आणि बीड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पाठक साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा, सोळंके साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्याला गौरविण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेंडगे सर, केंद्रप्रमुख श्री. खान सर, श्री पवार सर, श्रीमती निशिगंधा मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती भणगे मॅडम यांच्यासह शाळेचे कर्मचारी यांनी सम्राट चे व त्याचे वडील श्री.रावण किसन मस्के यांचे ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या