15.8 C
New York
Monday, November 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

डॉ योगेश क्षीरसागरच्या प्रयतनातून शहरांचा होतोय कायापालट, विविध भागात दर्जेदार कामे पुरग्रस्त काॅलनी भागातील मुख्य रस्ता आणि नाली कामाला सुरुवात सुरू.

डॉ. योगेश क्षीरसागरांच्या प्रयत्नातून शहराचा होतोय कायापालट; विविध भागात दर्जेदार कामे सुरू

 

पूरग्रस्त कॉलनी भागातील मुख्य रस्ता आणि नाली कामाला सुरुवात

 

बीड दि.११ (प्रतिनिधी) शहरातील प्रत्येक भागातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. मूलभूत सुविधांबरोबरच शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पूरग्रस्त कॉलनी भागात सुरू असलेल्या सिमेंट रस्ता, नाली कामाच्या पाहणी दरम्यान संगितले.

 

दलित वस्ती योजने अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ०३ मधील पूरग्रस्त कॉलनी भागात मुख्य रस्ता आणि नालीच्या कामाला सुरुवात झाली आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या या कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड शहरातील विविध भागात विकास कामे सुरू आहेत. त्यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला आहे. त्या निधीतून पूरग्रस्त कॉलनी भागाचा कायापालट होत आहे या प्रभागातील नागरिकांना सर्व सुविधा पूरविण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून विविध विकास कामे करण्यावर भर देण्यात येत आहोत. रस्ते, नाली, पाणी, लाईट या सुविधांमुळे या प्रभागाचा कायापालट होत आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊनच प्रभागातील सर्वच भागात चांगले कामे होत आहेत. यापुढे ही अशीच कामे होत राहतील असा विश्वास देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

 

पूरग्रस्त कॉलनीच्या मुख्य रस्त्याचा आणि नाली चा प्रश्न सोडविल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. व समाधान व्यक्त केले.

 

याप्रसंगी नगरसेवक प्रेम चांदणे, ॲड.विकास जोगदंड, रमेश वाघमारे, माजेद कुरेशी, साजेद जागीरदार, राहुल भैय्या शिंदे, ज्ञानेश्वर राऊत, शहानवाज खान, इकबाल भाऊ, पवन गायकवाड, कैलास वाघमारे, मोतीराम बचुटे, बाबू बनसोडे, सचिन वडमारे, बाप्पा जावळे, संतोष वडमारे, बब्रुवान वाघमारे, पप्पू डोळस, राम हिरवे, जय गायकवाड, संगीताताई वाघमारे, छाया वाघमारे, शितल गायकवाड, ज्योती वाघमारे, कांबळे ताई यांच्यासह स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या