28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

110ते 285 कोटी संदर्भात,औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर, शेख रियाज, शेख इजाज, आदीनाथ मुंढे,यांच्यावर कारवाई-आता डॉ अशोक थोरात याच्यावरही टांगती तलवार कायम. कोवीड साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार

 जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस एजन्सी दाखवून कोट्यवधी रुपयांचे कोवीड साहित्य आणि औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर,रियाज शेख  आणि एजाज अली उस्माणी शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.

प्रतिनिधी बीड-  बीड जिल्हा रुग्णालयामध्ये डॉ अशोक थोरात, डॉ सुरेश साबळे, डॉ सूर्यकांत गीते,आर एमो डाॅ सुखदेव राठोड, सह अन्य कोणतेही  जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर  औषध भांडार सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज शेख यांच्यावरच असायची या चौघांनी मिळून बीड जिल्हा रुग्णालय आणि शासनाची अक्षरशः कोट्यावधी रुपयांची लूट केली आहे.

कोरोना महामारी सारख्या कार्यकाळात निर्माण औषध निर्माण अधिकारी पदावर बसलेल्या तानाजी ठाकर आणि रियाज शेख, शेख एजाज अली उस्माणी या दोघांनी तर तत्कालीन डॉ अशोक थोरात डॉ सुरेश साबळे डॉ सूर्यकांत गीते , या सगळ्यांना आपल्या खिशात घालत करोडो रुपये छापले रक्त पेढी कर्मचारी गणेश बांगर व बहिण रक्तपेढी प्रमुख डॉ जयश्री बांगर बडतर्फ औषध भांडार प्रमुख राजरतन जायभाय यांच्या माध्यमातून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस एजन्सी काढून या चौघांनी शंभर ते दीडशे कोटी रुपये छापले

तानाजी ठाकर आणि रियाज शेख या दोघांना तर एवढा माज चढला होता की पत्रकार असो शासकीय अधिकारी असो किंवा चौकशी समिती कोणालाही ते मोजत नव्हते लातूर आणि मुंबई येथील चौकशी पथकाला अपुरे कागदपत्र देत चौकशीत असहकार्य केल्याचा ठपका देखील यांच्यावर समितीने ठेवला होता दरम्यान लोखडी सावरगाव येथील आरोग्य कर्मचारी पद बोगस नोकर भरती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे  यांचे निलंबन झाल्यानंतर ठाकर रियाज आणि एजाज यांच्यावरही कारवाई होणार हे निश्चित होते

दरम्यान तानाजी ठाकर याची उस्मानाबाद ग्रामीण रुग्णालय येथे तर रियाज शेख यांची कळंब येथे तडकाफडकी बदली झाली आहे दरम्यान याबाबतच्या 110 ते285 कोटींची कोवीड खर्चाचा  बोगस कोवीड साहित्य खरेदी केली.यासदर्भात तक्रारी दिपक थोरात यांनी केलेले होत्या. तर सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ कडे संबंधित  पुरावे आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सीजन प्लांट खरेदी आणि कोरोना काळातील औषध खरेदी प्रकरणात येत्या आठवडाभरात ठाकर आणि रियाज यांचे निलंबन होणार आहे. आता डॉ अशोक थोरात यांच्या वरही कारवाई ची टागती तलवार कायम आहे म्हणून डॉ अशोक थोरात पण निलंबित होऊ शकतात अशी चर्चा आरोग्य क्षेत्रात,  बीड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांच्यात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या