प्रतिनिधि – (अंबाजोगाई) अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पक्ष, सामाजीक संघटना, विदयार्थी संघटना , समाज माध्यमामंधे काम करणाऱ्या असंख्य तरूण बांधवांनो अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी पुढे रेटण्यासाठी होणाऱ्या सर्व आंदोलनांत तुमचा सहभाग आवश्यक आहे. याच जिल्हयाच्या आंदोलनामधुन तुमचं नवं नेतृत्व उमलणार आहे. तरूणांमधे प्रचंड उर्जा असते, तरूणांच्या ताकदीपुढे मोठमोठ्या महासत्ता झुकल्या आहेत याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतील. तेंव्हा तरूणांमधे असणाऱ्या नवनव्या कल्पना, कल्पकता व उर्जा यांचा सदुपयोग अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी व्हावा ही काळाची गरज आहे. तेंव्हा अंबाजोगाई जिल्ह्यासाठी अशा तरुणांनी पुढे यावे, वेगवेगळ्या विधायक मार्गाने जिल्ह्याचा मुद्दा ऐरणीवर आणावा. मोठया संख्येने जिल्हा निर्मिती कृती समीती व आंदोलनांमधे सहभाग नोंदवावा ही विनंती जिल्हा निर्मितीचे सदस्य तथा लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाव्हूळे यांनी केली आहे.