संशोधनकार्य समाजभिमुख व दर्जेदार असावे. उपप्राचार्य डॉ .विलास भिलारे,
चौसाळा महाविद्यालयात ए आर सी बैठक संपन्न…..
चौसाळा प्रतिनिधी दिनांक 11. 8 . 2023
नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये इतिहास आणि भूगोल या दोन विषयाच्या संशोधन केंद्रामध्ये विद्यापीठाच्या आदिशाप्रमाणे ए.आर.सी ची बैठक विषयतज्ञ डॉ के.पी गव्हाणे इतिहास व डॉ हरिदास पिसाळ भूगोल यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विलास भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ विलास भिलारे यांनी आज समाज विज्ञानाची कास धरत असून संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे संशोधक विद्यार्थी यांनी संशोधनाची कार्य दर्जेदार व समाजाला दिशा देणार संशोधन करणे गरजेचे असून संशोधनांमधून समाजाची प्रगती होत असते समाजाला ती संशोधन मार्गदर्शक ठरत असते कोरोना सारख्या जागतिक महामारी च्या काळामध्ये कोरोना आजारावर लस शोधण्याचे कार्य पुण्यातील इन्स्टिट्यूटने केले हे महाराष्ट्राचे भूषण ठरले आहे हे आपण सर्वांनी अनुभवले असून आपले संशोधन ही गृहीतके नमुना निवड तंत्र सिद्धांत याच्या आधारे टप्प्याटप्प्याने सखोल असे असावे यामध्ये प्रश्नावली मुलाखत आधी साधनांचा संशोधनामध्ये वापर करावा असेही सुचवले यावेळी विषय तज्ञ म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. गव्हाणे डॉ. पिसाळ यांनी केंद्रातील विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले या केंद्रांतर्गत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून संशोधन कार्य करणारी इतिहासाची 16 संशोधक व भूगोल विषयाचे 14 संशोधक संशोधन करत आहेत. भूगोल संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुधाकर वनवे हे काम पाहत आहेत तर इतिहास विषयाचे डॉ. आर पी पवार हे काम पाहत आहेत यावेळी डॉ.लांडगे डॉक्टर वाणी डॉ.अमर आल दे पी.जी डायरेक्टर डॉ. काकासाहेब पोकळे प्रा. समाधान माने प्रा.कदम प्रा. वायबसे इत्यादी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.