.
पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड, ता.जि. बीड.तक्रारदार:योगेश विश्वनाथ गवळी वय ३५ वर्षे, धंदा-ड्रायव्हर,रा. सिरसमार्ग, ता. गेवराई, जि. बीडमौ जे सिरसमार्ग येथील सचिन भाऊराव पवळ, अभिमन्यू बाबुराव पवळ, यांनी ग्रामसेवकाशी संगनमत करून बनावट पि.टी.आर. तयार करून माझी जागा बळकावण्याच्या हेतूने मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.मी वरील ठिकाणचा रहिवाशी असून, मी माझे मुले, पत्नी, आई- वडीलांसह राहती. आम्ही पुजारी आहोत. आमची मौजे सिरसमार्ग येथे माझ्या वडिलांच्या नावे ग्रामपंचायत कार्यालय, सिरसमार्ग अंतर्गत ५० बाय ८० फूट घर मालमत्ता आहे, ज्यास सिटी सर्व्हे क्र. ६४७ असा मिळाला आहे. सदर मालमत्ता ही आमचे गावातील ग्रामसेवक याचेशी संगनमत करून बनावट पि.टी. आर. तयार करून कुठल्याही दस्ताचा आधार न घेता स्वतःच्या नावे लावली आहे.