जे देते डोक्याला ताप, ते कर्म आहे पाप – पूज्य भिकू धम्मशील थेरो
धम्मभूमी धम्महाॅल शिवणी येथे वर्षावासाचा उत्साहात प्रारंभ
बीड प्रतिनिधी – जन्मताच कोणतीही व्यक्ती वाईट प्रवृत्तीची नसते. जसे जसे आपण मोठे होऊ,त्यापुढे मिळणारे संस्कार सहवास,आपली जीवनशैली आपल्या जीवनात सुखाचा दुःखाचा मार्ग ठरवीत असते. म्हणून जे देते डोक्याला ताप ते कर्म आहे पाप असे प्रतिपादन पूज्य भिकू धम्मशील थेरो यांनी केले. प्रियदर्शनीधम्म संस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने धम्मभूमी धम्महॉल डॉ.भदंत आनंद कौशल्यायन नगर शिवनी येथे श्रावण पौर्णिमेपासून तीन महिन्याकरीता धम्मशील भंत्ते यांचा अकरावा वर्षा वासाचा प्रारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व महामानवाच्या प्रतिमेस पुष्प,धुप,दीपाने भिकू संघाच्या हस्ते पूजन करून भंतेजीनी उपस्थितांना त्रिशरण,पंचशील दिले. ह्या वर्षावासास पूज्य भंत्ते मंगल बोधी औरंगाबाद हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून चंपावती नेत्रालयाचे डॉ.चंद्रसेन चौरे व सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी करून धम्मभूमी धम्माहॉल येथे धम्माच्या प्रसार व प्रचारासाठी नियमित पणे होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देऊन धम्म हा वाचनात, ऐकण्यात नाही तर आचरणात आहे हा तथागतांचा व डॉ.बाबासाहेबांच्या बहुमोल उपदेशाची सर्वांना आठवण करून दिली. व वर्षेवास कार्यक्रम का आयोजित केला जातो हे सांगितले.
पूज्य भंत्ते धम्मशील पुढे म्हणाले शील पालन केले तर ज्ञान वाढेल,दानत्व वाढेल व पूण्यकर्माचा संचय होईल,हातुन कुशल कर्म घडेल. आपल्या अंतानंतर आपले कुशल कर्मचा आठवले जाते. तथागतांच्या दुःख मुक्तीचा मार्ग कसा क्रमान करावा हे योग्य प्रकारे समजावून घ्यावयचे असेल तर भुक संघाच्या धम्मदेशातून योग्य प्रकार समजावून घेणे ही सुवर्णसंधी असते. दुःखद निवारण याकरता धम्म आणि विनयाचे पालन करून मनात प्रेम करुणा, मैत्रीभाव, दानशीलपणा जोपासून त्यानुसार आपले आचरण करणे तसेच हिंसा नकरणे, चोरीन करणे, काम वासणायुक्त व्यवहार नकरणे, खोटे नबोलणे व नशापाणी न करणे ह्या म्हणजे पाप करण्या पासून राहणे होय. दुःखापासून मुक्त होण्याचा तथागताचा मार्ग म्हणजे पंचशील, त्रिशरण, अष्टशील व दहा पारमितांचे पालन करणे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. प्रमुख धम्मदेशनीत पूज्य भंत्ते पुढे म्हणाले की शिल पालन केले तर ज्ञान वाढेल, दान वाढेल व पुण्यकर्माचा संचय होईल व हातून कुशल कर्म घडेल. आपल्या अंतानंतर आपले कुशल कर्मचा आठवल्या जाते. तथागताच्या दुःखमुक्तीचा मार्ग कसा क्रमन करावा हे जर योग्य प्रकारे समजावून घ्यावयचे असेल तर वर्षावासातील तीन महिन्यात भिकू संघाच्या धम्मदेशनीतून योग्य प्रकारे समजावून घेणे ही सुवर्णसंधी असते. या काळात एकाच ठिकाणी भिकू संघ वास करीत असतो. त्या त्या परिसरातील लोकांना ते धम्माचे ज्ञानदान करतात. तथागताच्या मार्गाने आचरण करणे हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे असे समजावून सांगतात. याकरीता धम्मशील भंतेजीनी तथागताच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. पूज्य भंते मंगल बोधीजी यांनी देखील वर्षावासातील धम्मदेशनेचे महत्त्व समजून सांगितले. सूत्रसंचालन उपासक खरात गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.जी वानखेडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे बहुसंख्य सदस्य बीड शहरातील व शिवनी परीसातील बहुसंख्य उपासक उपासकांची तसेच बालकांची उपस्थिती होती
.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अलकाताई सुमेध डोंगरे यांनी त्यांचा मुलगा शाश्वत च्या जन्मदिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन चंपावती नेत्रालयाच्या साह्याने आयोजित केले होते. या शिबिरात 55 रुग्णाची तपासणी करून औषध उपचार व पुढील गरजु असलेल्या वर नेत्रशस्त्रक्रिया अल्प दरात करण्याचे नियोजन केले, सरनातने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपला स्नेहांकित
भास्करराव सरपते,
कोषाध्यक्ष प्रियदर्शी धम्मासंस्कार शिक्षण संस्था, बीड.
मोबाईल नंबर -9322110964
सदरील बातमी ही बालाजी जगतकर यांच्या ईमेलवरून पाठवण्यात आली आहे.दि.3 ऑगस्ट bjagatkar@gmail.com