27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाने साजरा – संगिता चव्हाण

सामाजिक उपक्रमाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे अभिष्टचिंतन

पसायदान प्रकल्प व इन्फंट इंडियातील विद्यार्थ्यांना अ‍ॅड.संगिताताईंकडून अन्नदानासह शालेय साहित्याचे वाटप

बीड, दि.27 (प्रतिनिधी)ः- अनावश्यक खर्चाचा फाटा देत नेत्याचा वाढदिवस सार्थी लागावा यासाठी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या अ‍ॅड.संगिताताई चव्हाण यांच्याकडून शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील अनाथ मुलांना अन्नदानासह शालेय साहित्याचे वाटप करत सामाजिक उपक्रमाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अभिष्टचिंतन करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्यावतीने साजरा करण्यात आला. शिवसेनेचे विनायकराव राऊत, शिवसेना नेते अनिल देसाई, मराठवाडा संपर्कनेते चंद्रकांत खैरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेहरूकर यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार, महिला संपर्कप्रमुख सौ. संपदाताई गडकरी, जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगीताताई चव्हाण यांनी ढेकनमोह येथील गोवर्धन दराडे व रंजनाताई दराडे यांच्या पसायदान प्रकल्प येथील अनाथ मुलांना शालेय साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. तर इन्फंट इंडिया पाली येथे शालेय साहित्य व फळाचे वाटप मा.पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख फरजाना शेख, नुजत काझी, रेखा बाळ शंकर रोहिणीताई सविताताई इत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या