बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सर्व पक्षीय महिला माता-भगिनी यांनी सदरील घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व घोषणाबाजी करत मणिपूर सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई आठवले यांनी संबंधित मोदी सरकारचा मणिपूर सरकारला असलेला पाठिंबा व भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तिथं दिन दलित 18 पगड जातीच्या लोकांना त्रास होत आहे दलितांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत यासाठी हे आंदोलन करत आहोत असे सांगितले तर यावेळी अरुणाताई आठवले यांनी सदैव माणुसकीच्या नात्याने सर्व जाती धर्मासाठी लढणार असल्याचे सांगितले म्हणून आज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बीड येथे “महिला अत्याचार विरोधी कृती समिती बीड” मार्फत भव्य निदर्शने करण्यात आले. यावेळी मणिपूर येथील घडलेल्या घटनेतील आरोपींना “फाशीची शिक्षा झालीच पाहिजे” या प्रमुख मागणी सह सर्व महिला यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी अरुणाताई आठवले यांनी भारतीय जनता पार्टीचे केंद्र असलेले सरकार व एक महिला राष्ट्रपती असल्यामुळे तरी मणिपूर सारख्या घटनेच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी आवाज उठून संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन संबंधित न्याय द्यावा व पुनर्वसन करावे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या माता-भगिनी उपस्थित होत्या *