27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने युवा क्रिकेटर सचिन धसचा सत्कार संपन्न

*बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने युवा क्रिकेटर सचिन धसचा सत्कार संपन्न.*

 

  • बीड शहरातील छ्त्रपती संभाजी महाराज क्रिडांगण* येथे बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने *डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत युवा क्रिकेटर सचिन संजय धस व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अर्शियान सय्यद, शैराज खान, ऋषिकेश डोंगरे यांच्या कौतुक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.* नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बी.सी.सी.आय.च्या रणजी ट्रॉफी आणि मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य संघात सचिनचा समावेश करण्यात आला आहे.

 

यावेळी शुभेच्छापर बोलताना *डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर* यांनी सांगितले की, सचिनच्या आगामी खेळासाठी त्याला पाहिजे ते वेळोवेळी सहकार्य करू. आपल्या बीड जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे काम सचिन धस याच्या खेळातून होत आहे. त्याला प्रोत्साहनपर २१ हजार रुपये बक्षीस जाहीर करून त्याला आगामी खेळासाठी वेळोवेळी विविध माध्यमातून सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.

 

यावेळी नगरसेवक मुखीद लाला, इकबाल शेख, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलिम, ॲड.राजन साळवी, महेश (काका) वाघमारे, पालक संजय धस, इरफान कुरेशी, जावेद पाशा, आमेर सिद्दीकी, माजेद कुरेशी, इसा चाऊस, मोहसीन खान, शाहरुख पठाण, अतीन कुरेशी, अक्षय नरवडे, मनोज जोगदंड यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

 

#cricket #sports #सत्कार #सोहळा #cricketassociation #BEED #बीड

 

👆👆👆

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या