4.7 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

भव्य रॅलीने प्रचाराची सांगता माजलगाव शहर आडसकरमय

*भव्य रॅलीने प्रचाराची सांगता माजलगाव शहर आडसकरमय*

 

*विद्यापीठ नामांतराला विरोध करणाऱ्या जगतापांना जनता धडा शिकवणार*- *बाबुराव पोटभरे*

 

माजलगाव / सुनिल थोरात

 

माजलगाव शहरात न भूतो न भविष्यती निघालेल्या रॅलीने अपक्ष उमेदवार रमेश आडसकरांच्या प्रचार सभेची सांगता झाली. जुना मोंढा मैदानात आयोजित जाहीर सभेत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी तूतारीचे उमेदवार मोहन जगतापवर टीकास्त्र सोडले नामांतराला विरोध करणाऱ्या जगतापांना जनता धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आज माजलगाव शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस रमेश आडसकरांच्या शहरातून निघालेल्या अभूतपूर्व रॅली व जुना मोंढा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेने गाजला. सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून रमेश आडसकरांची रॅली निघाली या रॅलीला सभेच्या मैदानापर्यंत येण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ लागला. रमेश आडसकरांना पाठिंबा देण्यासाठी आज माजलगाव मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून जनतेने माजलगाव कडे धाव घेतली. अभूतपूर्व रॅलीमुळे संपूर्ण माजलगाव शहर आडसकरमय झाले होते. यावेळी आयोजित जाहीर सभेत माजी आमदार राधाकृष्ण अण्णा होके पाटील मोहन काका सोळंके बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव रिपाई चे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, युवा उद्योजक रामसेठ राठोड, मुजम्मिल पटेल, बाळासाहेब जाधव मनोहर डाके यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वच मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात रमेश आडसकरांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन रमेश आडसकर हेच माजलगाव मतदार संघाचे आमदार होतील अशी आशाही व्यक्त केली. माजी आमदार राधाकृष्ण अण्णा होके पाटील यांनी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यावर कठोर प्रहार केले पैसै घेऊन त्यांनी माजलगावचे तिकीट जगतापांना विकले. सर्व उमेदवारात रमेश आडसकर हेच योग्य असून जनता त्यांना निश्चित न्याय देणार असल्याचा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

चौकट

……………………………………..

*जगतापांची जातीयवादी मानसिकता विद्यापीठ नामांतराला केला होता विरोध*- *बाबुराव पोटभरे*

 

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी यावेळी आयोजित केलेल्या सांगता सभेत तुतारीचे उमेदवार मोहन जगताप यांच्यावर प्रखर आसूढ ओढले. मोहन जगताप हे स्वतःच्या वडिलांसमोर तसेच सभेस आलेल्या मायमाउली समोर अश्लील बोलतात. दारू पितो हे सुद्धा कबूल करतात एवढा चरित्रहीन व्यक्ती माजलगाव मतदार संघाचा आमदार म्हणून शोभत नाही तसेच मोहन जगतापांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला होता. ज्या व्यक्तीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जमत नाही त्या जातीवादी व्यक्तीला जनता या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवणार असल्याचेही पोटभरे यांनी याप्रसंगी सांगितले.

………………………………..

 

सांगता प्रचार सभेत मनोगत व्यक्त करताना रमेश आडसकरांनी त्यांच्यावर माजलगाव वासियांनी केलेल्या प्रेमाचा दाखला देत त्यांच्या उपकारातून आयुष्यभर उतराई होणार नसल्याचे सांगितले. मी जनतेचा उमेदवार आहे मला सर्व पक्षांचा पाठिंबा असून जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यास माजलगावच्या विकासासाठी रात्रीचा दिवस करून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सांगितले. जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार असून शेतकऱ्यांना विनामूल्य डीपी देणे ग्रामीण भागातील शेत जोड रस्ते सुधारणे प्रमुख देवस्थानांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा देणे तसेच मतदार संघात अनेक ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे नवीन माध्यमिक शाळांना मंजुरी देणे हे त्यांचे आघाडीचे विषय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत खूप कमी मतांनी हरलो परंतु दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर मी उभा होतो या निवडणुकीत खूप संघर्ष करून मी उभा राहिलो आहे. माजलगाव मतदार संघातील मायबाप जनतेने एकदा संधी देऊन बघावी त्यांच्या विश्वासास पात्र राहील अशीच कामगिरी करणार असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जुना मोंढा मैदान संपूर्ण खचाखच गर्दीने भरलेले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या