4.7 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

जनतेचा निर्धार पक्का दादांना यावेळी जोरदार धक्का

जनतेचा निर्धार पक्का दादांना यावेळी जोरदार धक्का !

दादा आपला टांगा पलटी झाला की चमचे फरार होणार*

*टक्केवारीचा “प्रकाश” दलित, मुस्लिम, मराठासह सर्व बहुजन मुलांच्या मुळावर*

माजलगाव, सुनिल थोरात

:- माजलगाव मध्ये प्रकाश दादांचे घर जाळले ही अत्यंत दुर्दैवी बाब होती त्या घटनेचे समर्थनकोणीच करू शकत नाही, परंतु या घटनेच्या अडून जे पुन्हा घडू लागले ते मात्र दादा चुकीचेच झाले कित्येक निष्पाप युवकांना गुन्ह्यात गोवले गेले त्यामुळे त्या युवकांना देशोधडीला लागण्याची वेळ आली पुन्हा असे खोटेनाटे गुन्हे दाखल करायलाच दादांना पुन्हा आमदार करायचे का ? असा सवाल जनताच उपस्थित करत असल्याने यावेळी नक्कीच फटका बसणार आहे.

 

स्वतः नितीन नाईकनवरे यांनी पाठींबा देतांना भावना व्यक्त केली आणि कसे तरुणांवर गुन्हे दाखल केले हे उघड सांगितले, कोणी केले हे सर्व कोणाला माहिती असो नसो मात्र तुमचे घर जाळले गेले आणि झळ निष्पाप लोकांना बसली त्यामुळे त्यांना सणासुदीच्या दिवसात कोणी जेल मध्ये तर कोणी फरार राहून दिवस काढले ते लोक आत्ता प्रकाश सोळंके यांना धक्का देण्याच्या मानसिकतेत आहेत.

गेले वीस ते पंचवीस वर्षे माजलगाव मतदार संघावर एकाधीकार शाही चालवणाऱ्या आमदार प्रकाश सोळंकेना मतदार संघात *टक्केवारीबाज* आमदार म्हणून जनतेत चर्चिले जात आहे.

त्याची प्रचिती ही मतदारसंघात अनेकदा दिसून आलेले आहे टक्केवारी घेऊन मतदार संघ भकास करणाऱ्या आमदारांचा भुरका कित्येकदा फाटलेला आहे.

त्याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील माजलगाव शहरातील रस्ते मतदारसंघातील रस्ते हे पूर्णतः बोगस करण्यात आलेले आहेत मतदारसंघात झालेली निकृष्ट दर्जाची कामे ही सर्व जनतेने उघड्या डोळ्यांनी गेल्या पाच वर्षात जनतेने पाहिलेली आहेत.

बगलबच्चना संभाळताना अक्षरशा आमदारांनी नंगा नाच केलेला आहे कधी नव्हे ते मतदार संघात दहशतीचे वातावरण आमदार प्रकाश सोळंके यांनी आज घडीला तयार करून ठेवलेली आहे गुंड लोकांना पाळून कित्येक तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने सुडाचे राजकारण करून गुंतवण्याचा मनसोबा मतदारसंघातील जनतेने गेल्या पाच वर्षात अनुभवलेला आहे. त्यामुळे प्रकाश सोळंके यांना नक्कीच यंदा जनता धडा शिकवणार असल्याचे बोलले जात आहे .

*मतदार संघात रमेश आडसकर , मोहन जगताप या दोघांच्याच नावाची चर्चा*

माजलगाव मतदार संघात सध्या तरी प्रकाश सोळंके यांचं अस्तित्व आज काही राहिलेलं नाही असे जनसामान्यांची भावना दिसून येत आहे त्यामुळे पुढचा आमदार कोण करायचा ? या विचारात असलेल्या मतदारसंघातील जनतेने आता रमेश आडसकर आणि मोहन जगताप यांच्याच नावाची चर्चा सुरू केली आहे.

पुतण्या जयसिंग सोळंके यांची उमेदवारीला आडकाठी करून त्यांच्या मुळावर उठलेल्या आमदार दादांनी मतदारसंघाच्या मुळावर उठू नये अशीच जनसामान्यांची भावना असल्याने आता टक्केवारीचा “प्रकाश” आता नकोच आता बदल घडवायचा आहे या चर्चेने मतदार संघात जोर धरला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या