7.2 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

सुप्रियाताईच्या सभेने वारं फिरलं… विजयावर शिक्का मोर्तब..! मोहन जगतापाचीं सीट बम्पर मतांनी लागणार.

सुप्रियाताईच्या सभेने वारं फिरलं… विजयावर शिक्का मोर्तब..!

मोहन जगतापाचीं सीट बम्पर मतांनी लागणार..

शेवटच्या श्वासा पर्यंत आरक्षणाच्या लढाईत राष्ट्रवादी ताकदीने सर्व जातीच्या सोबत आहे-सुप्रिया सुळे

माजलगाव : सुनिल थोरात

धनगर मराठा मुस्लिम आणि लिंगायत सर्व आरक्षणाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ताकदीने तुमच्या सोबत आहे.अडचणीत आलेल्या सर्व शेतकऱ्याचीं कर्जमाफी करण्याचे आम्ही शब्द देत आहोत. तसेच आरक्षण, महिला, शेतकरी आंदोलनातील सर्व खोटे गुन्हे रद्द करणार असल्याचा शब्द देतानाच माजलगाव चे उमेदवार मोहनराव जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन सुप्रियाताई सुळे यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांच्या प्रचारार्थ मंगलनाथ मैदान येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थित हजारो मतदारांना दिला.

यावेळी व्यासपीठावर उमेदवार मोहनराव जगताप सोबत खा बजरंग सोनवणे, माजी आ उषाताई दराडे, माजी आ बाजीराव जगताप, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आवाड, डॉ नरेंद्र काळे गिरीकभाभी पंडित दयानंद स्वामी श्रीहरी काळे, नारायण डक ईश्वर मुंडे सतीश सोळंके नितीन नाईकनवरे, नारायण होके, युवराज लगड, विश्वाबर थावरे ,भाई गंगाभीषण थावरे,,भाई नारायणराव गोले, दत्ता कांबळे, कॉम्रेड मुदस्सीक बाबा सर,कॉम्रेड मोहन जाधव, महावीर मसके, कचरू खळगे, संतोष यादव, शेख रशीद,श्रीराम खलगे, श्रीराम मुंडे, विलास बडे, अरुण इंगळे, नानाभाऊ शिंदे, भास्कर उजगरे, सुरेश भोरे, शेख इम्रान, ऍड मीरा तौर, शकील कुरेशी सह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना महिला आरक्षणच्या बिलावर आ सोळंके गैरहजर राहिल्याचा आरोप ही सुप्रिया सुळे यांनी केले.कार्यकर्त्यांना लाथ मारणारी भाजपची आजची संस्कृती आहे या संस्कृतीस हद्दपार करा आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या मोहनराव जगताप यांनाही विजयी करा असे आवाहन ही सुळे यांनी केले.

प्रा ईश्वर मुंडे, तौफिक सत्तार यां अपक्ष उमेदवारानी मोहनराव जगताप यांना यावेळी पाठिंबा दिला.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

विराट सभा पाहून आजच विजयनिश्चित – खा बजरंग सोनवणे

आजचीही विशाल जाहीर सभा पाहून आजच विजय निश्चित झाल्याचे खा बजरंग सोनवणे म्हणाले लोकांनी घरी बसावावे ही प्रकाशसोळंकेची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करा खोटे गुन्हे दाखल करणारा आमदार पाडा, ऊस येडेश्वरीला जाईल म्हणुन मान्य झालवले घाटाचे रुंदीकरण होऊ दिले नाही असा आरोप आ सोळंके वर केला सोबतच मोहन जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन खा बजरंग सोनवणे यांनी केले.

राजकीय सूड उगवण्यासाठी आ सोळंकेनी गोर गरीबाच्या पोरावर गुन्हे दाखल केले -उषाताई दराडे

राजकीय सूड उगवण्यासाठी आ सोळंकेनी मराठा आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप उषाताई दराडे यांनी केला. आ सोळंकेना निवडून का द्यावे असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारत मोहनराव जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन केल.

सुप्रियाताईचा साधेपणाने लोकांची मने जिंकली .

सुप्रिया ताई साठी ठेवलेली महाराजां खुर्ची त्यांनी नाकारली, युवक पाय पडू लागले त्यांना पाया पडू दिले नाही, युवकांसोबत सेल्फी घेणे, सगळ्यांचे सत्कार स्वीकारणे, मोहन जगताप यांना भावाचा दर्जा देणे, युवकांना प्रश्न विचारू देणे, गिरीका भाभी पंडित व उषा दराडे यांना मिठी मारणे, माजलगावचा एकच दादा… मोहन दादा या त्यांनी दिलेल्या घोषणे मुळे आसमंत दनाणून गेला… या सगळ्या साधेपणा मुळे युवकांनी सुप्रिया सुळे व मोहन जगताप यांना डोक्यावर घेतले.

* लोकसभेला जशी साथ दिली विधानसभेला साथ द्या

*मोहन जगताप सारख्या कर्तृत्वान माणसासाठी मत मागायला आले याचे समाधान

लोकसभेला पराभव झाल्यावर बहीण लाडकी झाली

विरोधी उमेदवाराला चिन्ह खाली लिहावे लागते की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे

पक्ष पळवून नेल्याची कोर्टातील लढाई महाराष्टच्या स्वाभिमानाची

वकफच्या लढाईच्या वेळेस तुमच्या विरोधी उमेदवाराचा पक्ष कोठे होता विचारा .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या