2.2 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

मोटारसायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली

🔸चोरट्यांकडून १६ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश

गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातसह छत्रपती संभाजीनगर, जालना आणि सातारा या जिल्ह्यातून मोटरसायकल चोरुन ती जिल्हा बदलून विक्री करणाऱ्या टोळीतील तीन जणांना एलसीबीच्या टीमने ताब्यात घेतले असून, या टोळीवर इतर ९ गुन्हे दाखल आहेत. तर पकडण्यात आलेल्या या चोरट्यांकडून १६ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखाली अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिले. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे त्यांचे पथक माजलगाव व गेवराई उपविभागात मोटारसायकल चोरीच्या घटनेच्या आरोपींची माहिती काढत असताना गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे अभिजित सटवा वाघमारे, आदित्य सटवा वाघमारे, शहादेव भिवाजी अवघडे, यांनी काही दिवसापूर्वी मोटरसायकल चोरी केलेल्या असून ते सध्या तलवाडा ते माजलगाव जाणाऱ्या रोडवरील हिवरा फाट्याजवळ‌ उभे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी कळवून त्यांनी तात्काळ माहितीची खात्री करून मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले व पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे व त्यांचे पथक बातमीच्या ठिकाणी जाऊन शिताफीने तीन इसमाना ताब्यात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता, त्यांनी माजलगाव शहर येथील एक पल्सर मोटारसायकल चोरी केली असून सदर मोटारसायकल ची खात्री केली असता माजलगाव शहर १४९/२०२४ क.३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तीन इसमांना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी पुणे जिल्ह्यातून ०२, जालना जिल्ह्यातून ०५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ०२, सातारा जिल्ह्यातून ०५, परभणी जिल्ह्यातून ०२, मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली आरोपी अभिजीत सटवा वाघमारे (वय २१ वर्ष) , आदित्य सटवा वाघमारे (वय १९ वर्ष) , शाहादेव भिवाजी अवघडे (वय २३ वर्ष) सर्व रा. हिवरा, ता.माजलगाव, यांना व मोटरसायकलचा मुद्देमाल पोलीस स्टेशन माजलगाव शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेला असून पुढील तपास माजलगाव शहर व स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, केतन राठोड, पोलीस निरीक्षक माजलगाव शहर, पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, सफौ/ हनुमंत खेडकर, सफौ/ कैलास ठोंबरे, नसीर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, देविदास जमदाडे, तुषार गायकवाड, निलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर, पोशि/ बप्पा घोडके, विकी सुरवसे, चालक गणेश मराडे, यांनी केली आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या