गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथे भावकीतील एकाने शेतीच्या बांधावरून चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना आज दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आरोपीने पोटावर चाकूने वार केले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकर्यास वैद्यकीय उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यावर साधारणता २५ ते ३० टाके पडण्याचा अंदाज डाॅक्टराने व्यक्त केला. जखम खोलवर असल्यामुळे डॉ कादरी यांनी पुढील उपचारासाठी बीडला हलविण्याचा सल्ला दिला आहे. कृष्णा जगन्नाथ गवारे असे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही खळबळजनक घटना तालुक्यातील देवपिंपरी येथे घडली आहे. या घटनेनं त्या ठिकाणी काही काळ तणाव होता.