14.6 C
New York
Monday, November 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

निगडी येथील शिवभूमी विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षिका कवयित्री लेखिका श्रीम कोठेकर योगिता संजय महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र आरंभ : दि १५ जून २०२४ रोजी डॉ आंबेडकर भवन मालधक्का येथे आयोजित महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्य अतिथी.माजी अतिरिक्त आयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक.उपआयुक्त श्री. युनूस पठाण पुणे महानगर पालिका पुणे.ॲड. सौ. शैलजा ज्ञानेश्वर मोळक वक्ता, लेखिका, संपादिका व प्रकशिका.

अध्यक्ष श्री.विनोद खैरे सिनेआर्क प्रॉडक्शन्स व रूद्रांश फाउंडेशन इ . मान्यवर उपस्थित होते . यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ हा सन्मान निगडी येथील शिवभूमी विद्यालय प्राथ विभागातील उपक्रमशिल ,तंत्रशिक्षिका कवयित्री लेखिका श्रीम. कोठेकर योगिता संजय यांना देण्यात आला . श्रीम कोठेकर योगिता गेले तीस वर्ष निगडी येथील शिवभूमी विद्यालयात कार्यरत असून चांगले बालक घडविण्यासाठी त्यांचे विविध उपक्रम चालू असतात प्रयोग स्पर्धापरीक्षा बाह्यपरिक्षा अशा वेगवेगळ्या तऱ्हेने विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करीत असतात तसेच समाज जागृती प्रबोधनाचे कार्यही त्या आपल्या कवितेमार्फत करीत असतात त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत . वृक्षारोपन, व्यसनमुक्ती, पर्यावरण , परिसर स्वच्छता, गरिब अपंग गरजूंना मदत असे सामाजिक कार्य ही त्या करीत असतात . याच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .असे पुरस्कार सदैव कार्य करण्यास प्रोत्साहन देतात तसेच जबाबदारीचे भान ठेवायला मदत करीत असतात तसेच पुढील वाटचालीसाठी प्रेरित करीत असतात पुरस्कारासाठी सर्व स्तरातून या उपक्रमशील शिक्षिकेचे कौतूक होत आहे . शुभेच्छा दिल्या जात आहेत .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या