बीड महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष मजबुतीसाठी शिवसंग्राम पक्षाने बीड शहरातील कार्यकारिणी जाहीर केली असून सुशील (आप्पा) कांबळे यांची शहर संघटक पदी निवड केली आहे.आगामी काळात होणाऱ्या विधानसभा, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बांधणी व विस्ताराचे अनुषंगाने शिवसंग्राम भवन, नगर नाका, बीड येथे दि.१६ (रविवार) रोजी शिवसंग्राम च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक संपन्न झाली. यावेळी शहरातील विविध प्रभागातील प्रभाग प्रमुखांच्या सोबतच शहर कार्यकारिणी सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. यात प्रामुख्याने शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, सहर सचिव, शहर सहसचिव, कोषाध्यक्ष, संघटक व विभाग प्रमुख यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी डॉ.ज्योती ताई मेटे यांच्या हस्ते सुशील कांबळे यांना नियुक्तीपत्र देऊन शहर संघटक पदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे निवड केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शिवसंग्राम पक्षाचे एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या सुशील कांबळे यांचे अभिनंदन केले जात आहे.