गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : माजलगाव तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नाल्यांना व नदीला पूर आला आहे. दरम्यान कोथाळा येथील सरस्वती नदीला पुन्हा एकदा पूर आला असून कोथाळा- सिरसाळा गावांचा संपर्क तुटला आहे. माजलगाव तालुक्यात मागील आठवड्यात देखील मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन झाले. जोरदार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान सरस्वती नदीला पुन्हा पूर आला आहे. यामुळे कोथाळा- सिरसाळा या दोन गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.
पिकांच्या वाढीस मदत
दरम्यान पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करून टाकली होती. आता हा पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी व कापूस लागवड केली असल्याने सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या पिकाला पावसामुळे चाल येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.