🔸शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीरराजे पंडित यांची प्रेरणा
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, बीड संचलित माध्यमिक विद्यालय, धोंडराई ता.गेवराई येथे सन – २०२४ – २५ या शैक्षणिक सत्रासाठी आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून शनिवार दि.१५ जुन रोजी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव( दादा) पंडित, संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष तथा युवा नेते रणवीर पंडित यांच्या प्रेरणेने शाळेत नेहमीच वेगवेगळे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरम्यान सन- २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरु झाले असून यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग सह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बागपिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेवराव शिंदे, जि.प.मा.शाळेचे मुख्याध्यापक शहाणे, अरुण खरात, शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज पौळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.