🔸कुटुंबियांचा घातपाताचा संशय; पुढील पोलीस तपास सुरू..
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आज (दि.13) गेवराई-जातेगाव रस्त्यावरील टीएमसी परिसरात आढळून आला आहे. यामुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश नाथा आबदगिरे (वय ४५, रा.मुंगी ता.पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गेवराई शहरातील यशराज नगर येथे राहत होते. शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश आचाऱ्याचे काम करत होते. बुधवारी (दि.12) रात्री हॉटेल काम आटोपून बाहेर पडले.परंतु, गणेश आबदगिरे यांचा मृतदेह आज टीएमसी परिसरात आढळून आला. दरम्यान, गणेश यांची दुचाकी एका ठिकाणी तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने घातपातची शक्यता असल्याचे कुटुंबीयाचे म्हणणे आहे. याबाबत गेवराई पोलिसांना माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.