🔶धारुर घाटामध्ये अनेकांचे गेले बळी;खासदार,आमदार कुभंकरणांच्या झोपेत
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : धाराशिव येथून सिरसाळा कडे लोखंड घेऊन जाणाऱ्या टेम्पो घाटात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चालक क्लीनर सुखरूप बचावले. अपघातानंतर टेम्पोचे मागचे दोन चाक रस्त्यावर आले होते. चाके रस्त्यावर आल्याने आर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.
धारुर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर घाटातील धोकादायक वळणावर रविवारी (दि. ९) सकाळी अपघात घडला. धाराशिव येथून सिरसाळाकडे लोखंड घेवून जाणारा टेम्पो (क्र. एम एच ०४इ, एल ९०५१) एका वळणावर ब्रेक निकामी झाले होते. टेम्पो खोलदरीत जाणाऱ्या भीतीने चालकाने रस्त्यालगत डोंगरावर वळवला.
टेम्पो वर गेल्यानंतर मागची दोन चाक बाजूला निसटून रस्त्यावर अली यात चालक व क्लिनर सुखरूप बाहेर आले. अपघातानंतर टेम्पोचे मागचे दोन चाक मोडून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती नागरिकांच्या मदतीने टेम्पोचे चाके रस्त्याच्या बाजूला काढण्यात आले नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.