20.7 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

तीन हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकाला एसीबीने रंगेहाथ पकडले!

🔸या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

🔸सततच्या लाचखोरीच्या घटनेनं लाचखोरांचा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख निर्माण होऊ लागली?

गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : शाळा दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या मुख्याध्यापकास शुक्रवार (दि.०७) रोजी बीड एसीबीने कारवाई करत रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

केज शहरातील खासदार रजनी पाटील यांच्या खाजगी शिक्षण संस्थेच्या रामराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज सोनवणे यांनी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची दुय्यम प्रत देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत सदरील विद्यार्थ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड एसीबीने सापळा लावला आणि तीन हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे लाचखोर मुख्याध्यापकांची सेवावृत्ती ही दोन-अडीच वर्षावर आलेली आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, श्रीराम गिराम यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातत्याने लाचखोरीच्या घटना उघडकीस येत असल्याने सध्यातरी लाचखोरांचा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख निर्माण होताना दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या