गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल लागल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी ९२ टक्के घेऊन दहावी पास होऊन हे घवघवीत यश मिळवले आहे. प्रेरणा आसाराम खंडागळे असे या घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी देवपिंपरी या गावातील एका शेतकऱ्याचा मुलीने केले आहे. तिने दिवस-रात्र अभ्यास करून आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.
माध्यमिक विद्यालय देवपिंपरी या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा खंडागळे याने मेहनत व चिकाटीच्या जोरावर दहावीत चांगले गुण संपादन केले आहे. आई-वडिलांकडून आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात, प्रतिकूल परिस्थितीत प्रेरणा खंडागळे याने हार न मानता जिद्दीने त्याच्या स्वप्नांना साकारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून हे यश मिळवले आहे. यश संपादित केल्यामुळे प्रेरणाचे कौतुक होत असून पुढील शैक्षणिक संघर्षमय वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छा मिळत आहे.
प्रेरणा खंडागळे च्या उत्कृष्ट अभ्यास कलेच्या कौशल्याचे कौतुक केले जात आहे. आणि यापुढे त्याला उत्कृष्ट असे अभ्यास करून पुढील शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठं करिअर करून मोठ्या पदावर विराजमान होऊन जनतेची सेवा करावी म्हणून गावकऱ्यांकडून शुभेच्छा मिळत आहे. तसेच प्रेरणा खंडागळे च्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावकऱ्यांनी तिचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.