20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

➡️आंतरजिल्ह्यातुन मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश 🔸बीड, अहमदनगर, धाराशिव, सातारा या जिल्ह्यातून मोटारसायकलीची चोरी ही टोळी करत होती

🔸बीड, अहमदनगर, धाराशिव, सातारा या जिल्ह्यातून मोटारसायकलीची चोरी ही टोळी करत होती

गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्यांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखाली अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने (दि.२७ मे) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम चोरीची हिरो होंडा फॅशन मोटरसायकल विकण्यासाठी सोमेश्वर मंदिर, बार्शी रोडच्या बाजूला कोणाची तरी वाट पाहत त्या ठिकाणी बसला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सदरची माहिती देवून पो.नि यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांना मार्गदर्शन करून पुढील कारवाईसाठी आदेश दिले, त्यावरून पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांचे पथक तात्काळ मिळालेल्या त्या बातमीच्या ठिकाणी रवाना होऊन तो इसम पथकाला बघून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना शिताफीने पकडून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश उर्फ बालाजी दिनकर पायाळ (वय २४ रा.थेरला ता.पाटोदा) असे सांगितले, त्याच्या जवळ असलेल्या मोटरसायकलची अभिलेख पडताळणी केली असता, सदरील ती मोटरसायकल चोरीची असल्याचे समजले. त्याला अधिक विचारपूस केली असता, त्याने व त्याचे इतर एक साथीदारांनी मिळून एकूण १० मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

इतर एक मोटर सायकलचा मालकी हक्क व गुन्हे दाखल असल्याचा शोध घेण्याचे काम चालू आहे. सदर आरोपींनी चोरलेल्या दहा मोटारसायकली अंदाजे किंमत ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल तपासात जप्त करण्यात आलेला असून सदर आरोपीकडून मोटरसायकल चोरीचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरील आरोपीला आणि १० मोटारसायकली पुढील कारवाईसाठी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. उर्वरित एक आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असून पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.

सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे, सफौ/ तुळशीराम जगताप, पोह/ पी.टी.चव्हाण, पोह/ विकास राठोड, पोह/ राहुल शिंदे, पोह/ देविदास जमदाडे, पोना/ बाळू सानप, पोशि/ अलिम शेख, पोशि/ अश्विनीकुमार सुरवसे, चालक पोशि/ सुनिल राठोड यांनी केली आहे.

 

चौकट – खालील नमुद प्रमाणे ९ गुन्हे उघडकीस!

1)पो.ठा.शिवाजीनगर(बीड) गुरनं 223/2024 कलम 379 भादंवि पॅशन प्रो 2) पो.ठा.शिवाजीनगर(बीड)‌गुरनं 172/2024 कलम 379 भादंवि युनिकॉर्न 3) पो.ठा.शिवाजीनगर (बीड) गुरनं 222/2024 कलम 379 भादंवि स्लेंिकडर 4)पो.ठा.शिवाजीनगर (बीड) गुरनं 239/2024 कलम 379 भादंवि स्लेंिकडर 5) पो.ठा.पाटोदा (बीड) गुरनं 223/2024 कलम 379 भादंवि स्लें्लडर 6) पो.ठा.जामखेड(अहमदनगर) गुरनं 139/2022 कलम 379 भादंवि होंडा शाईन 7) पो.ठा. धाराशिव ग्रामीण(धाराशिव) गुरनं 018/2022 कलम 379 भादंवि बजाज प्लॅटिना 8) पो.ठा. फलटण ग्रामीण (सातारा) गुरनं 412/2024 कलम 379 भादंवि होंडा शाईन 9) पो.ठा. फलटण शहर (सातारा) गुरनं 226/2024 कलम 379 भादंवी प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या