28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

➡️ बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवाईचा धडाका सुरूच

🔸३० हजारांची लाच घेताना एसटी महामंडळाचा कामगार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गेवराई‌ प्रतिनिधी, (महाराष्ट्र आरंभ) : आपल्याच कर्मचाऱ्याकडून ३० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बीडमधील कामगार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई सायंकाळी साडे सहा वाजता धाराशिव येथील पथकाने केली. दिनेश राठोड असे पकडलेल्या कामगार अधिकाऱ्याचे नाव आहे. राठोड याने आपल्याच कर्मचाऱ्याकडे एका कामासाठी ६० हजार रूपयांची लाच मागितली होती. परंतू तक्रारदाराने बीड एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. बीड एसीबीने आठवडाभरात कारवायांचा धडाका लावल्याने त्यांच्याकडे या कारवाईसाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी धाराशिव येथील पथकाला बोलावले. या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रापमच्या विभागीय कार्यालयात जावून राठोडला पहिला हप्ता ३० हजार रूपये घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने केली. त्यांना बीडच्या पथकाने सहकार्य केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या