27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

◼️शेतकऱ्यांकडून 28 हजाराची लाच घेणाऱ्या पाटबंधारे अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा

🔸200-500 च्या करकरीत नोटांची थप्पी अन् चांदीची भांडी छाप्यात सापडली

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू आहे. अशातच त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आलेत. तर 30 ग्रॅम सोने, 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे. गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने राजेश सलगर यांना रंगेहात पकडले होते. याच अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राजेश सलगर हे परळीतील गजानन इमारतीमध्ये राहतात. एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यांच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, अंमलदार सुरेश सांगळे, सुदर्शन निकाळजे , स्नेहलकुमार कोरडे आणि गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या