🔸ड्रायव्हरने पावती मागताच दमदाटी करून सदर पोलीस घटनास्थळावरून पसार
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ एका डीजे च्या गाडीला अडवून चार हजार रुपये लाच स्वीकारल्याची घटना आज दि.३१ मे २०२४ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई येथील डीजे गाडी ही माजलगाव- सावरगाव या मार्गावरून जात असताना. सावरगाव परिसरातील पेट्रोल पंप जवळून जात तेवढ्यात MH.23.AS.0061 या गाडीतून येऊन ट्रॅफिक पोलीस अधिकारी विजय चंद्रकांत जाधववर यांनी गाडी थांबवली आणि ड्रायव्हरची दमदाटी करून चार हजार रुपये लाच मागितली. गाडी चालकांनी ओळखीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तसेच पत्रकार यांना फोन लावला असता आम्ही कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जुमानत नाही अशा प्रकारे ड्रायव्हरला दमदाटी केली व पैसे देण्याकरिता दबाव टाकला.
पैसे न दिल्यास तुमची गाडी जप्त करू तुमच्यावर गुन्हे नोंद करून अशी धमकी दिली. ट्राॅफीक पोलिसांनी गाडी चालकाचा व साथीदाराचा मोबाईल घेऊन सदर गाडी चालकांकडून विजय जाधववर यांना चार हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर गाडी चालकाने पावती मागितली असता सदर पोलीस अधिकारी घटनास्थळावरून पसार झाले. अशा लाचखोरी पोलीस कर्मचाऱ्यांमुळे बीड पोलीस दलाची प्रतिमा काळी होत चालली आहे. पोलीस अधीक्षक साहेब या लाचखोरी पोलीस कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
चौकट – गाडी सोडवण्यासाठी पोलिसांनी लाच घेतल्या प्रकरणी आज दैनिक महाराष्ट्र आरंभ वृत्तपत्रात बातमी छापली होती. परंतु ॲपरेटरकडून नजरचुकीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकीच्या गाडीचा नंबर चुकीने छापण्यात आले आहे. तरीपण सदरील त्या गाडीचा MH.23.AS.0061 हा क्रमांक आहे. पुढील कारवाईसाठी हा नंबर घ्यावा