27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

नावापुरते आरक्षणवादी सरपंच,उपसरपंच,सदस्य काय कामाचे- डॉ जितीन वंजारे

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- गावागावात इतके काही गुलाम आहेत की त्यांची काम ठरलेली आहेत .कदाचित ते आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य असतीलही पण फक्त नावापुरतेच किंवा सही पुरतेच …….! गुलामी कायम त्यांच्या अंगात आहे .नुसते हुजरा मुजरा अन् पळापळ करतात सतरंज्या आरामशीर उचलणाऱ्या त्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या रे …..जातीय नेस्तणाभुतीची पुरती अनुभूती त्यांनाही कोणीतरी करून द्या नसता आहे तिकडे उष्ट्यावरच सांगेल ते गुलामगिरीन काम करतात मला त्यांची कीव येते.अजून त्यांच्या फिक्स जागा ज्या कायम अंधारात आहेत,गुलामीत आहेत त्या तशाच आहे .मग महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या त्या एस टी एस सी कलामांच काय ? ह्यांना गुलामीच करायची होती तर उगाच आरक्षणाचा उपभोग घेऊन भीगी बिल्ली होऊन बिळात राहता कशाला. पद घेतात पण सहीपूर्तेच त्यांचा बोलवता धनी वेगळाच असतो.जस सरपंच गावात महिला असते पण ती घराच्या आत .सगळं तर तिचा पतीच करतो अगदी तसच हे फक्त सही पुरत. म्हणजे ‘शूद्र,नारी पशू सम’ ह्याच तंतोतंत पालन करतात.काय त्या सत्तेला उपयोग.माझं तर स्पष्ट मत आहे स्वर्गाचा गुलाम होण्यापेक्षा नरकाचा राजा झालेलं केंव्हाही बर,सत्ता येऊनही यांना घराची कवलही बदलता येत नसतील,चोवीस तास लोकांसाठी वापरून दिलेल्या पांढरा कपडा घालून गुलामीच करायची तर पुढच्या पिढीला तुमचा आदर्श काय? तुम्ही सरपंच उपसरपंच सदस्य झालात अभिमान आहे पण त्यापेक्षा गुलामीतून झालात ह्याची घृणा येते,थू करून पिचकारी टाकावी वाटते तुमच्यावर आणि तुमच्या पदावर जे पद आपल्या समाज बांधवांसाठी कामाला येत नसेल त्याचा राजकीय फायदा आपल्या समाजाला होत नसेल तर त्या पदाचा काय फायदा.अरक्षनातून मिळालेलं राजकीय पद समाजासाठी खर्ची घातलं पाहिजे ना की उच्च जातीच्या लोकांची बूट पुसण्यासाठी….!

महामानवाने ह्यासाठीच केला का इतका आटापिटा,रक्ताची शाई,ह्या साठीच लिहिलं का संविधान गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा उच्च नीच भेदाभेद मिटवण्यासाठी चा हा संघर्ष होता विसरू नका बडव्यांनो.आरक्षित जागा वापरायच्या आणि खुशाल गुलामगिरी करायची ही कसली सत्ता ही कसली क्रांती ही अधोगती आहे.समाजाचं आरक्षणाच घोड अश्या प्रकारे अडवू नका ते नवाबी रूप दाखवण्यासाठी आहे गुलामच शिंगरू होऊन हेलपाटे घालवण्यासाठी नव्हे.अजूनही गावा-गावात तत्सम खालचे कमी दर्जाचे कामे ह्यांच्याकडे च,गुलामगिरीचे तंतोतंत पालन करताना कागदी,नावापुरते कर्मचारी दिसले की हसू येत शिक्षणाचे धडे देऊनही इतके गुलामीचे बोकड असूच शकतात कसे मला पडललेला प्रश्न? बर समाजाने तरी अश्याना का बर पुढं करावं सामाजिक राजकीय साक्षरता अजूनही नाही याच हेच फलित बर असूद्या तरीही त्यांचा गुलामितला माज वेगळाच असतो.त्यांना कचरा,सतरंज्या उचलणाऱ्या कामांचा पण विशेष अत्यानंद आहे असो त्यांची गुलामी तुम्हाला लक लाभ,पण आमचा सरपंच, उपसरपंच सदस्य आमचा आमदार खासदार मंत्री आणि राष्ट्रपती असा गुलामगिरीत असेल तर नुसत्या पदाला काहीच उपयोग नाही अश्या गुलामांपेक्षा घरातील मोकळं सोडलेला स्वान बरा ..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या