25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

मुलांना संपत्ती पेक्षा चांगले संस्कार द्या – शिवाजी महाराज नारायणगडकर

◼️सुशीत अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- साधू-संताच्या सानिध्यात राहून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या सारख्या महान ग्रंथांचे वाचन करा त्यात सर्व प्रश्नाचे उत्तर सापडतात. तर शेतकऱ्यांनो परिस्थिती कोणतीही असो परिस्थितीवर मात करायला शिका आत्महत्या करु नका. तसेच शेती विका पण पोर शिकवा मुल सुशिक्षित बनवा तसेच मुलांना संपत्ती पेक्षा चांगले संस्कार द्या तीच खऱ्या अर्थाने कुटूंबाची प्रगती होय असे प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणगड संस्थान चे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांनी व्यक्त केले.

गेवराई तालुक्यातील सुशी (वडगाव) येथे सुरु असलेल्या ३७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवार दि.८ मे रोजी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प.महंत प्रेममुर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान चे महंत दत्ता महाराज गिरी,डिंगाबर महाराज कुलकर्णी, ॲड.अंबादास जाधव यांच्यासह संत-महंत व पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुढे बोलताना शिवाजी महाराज म्हणाले की अखंड हरिनाम सप्ताहात सर्वांनी एकत्र येवून सप्ताह केला पाहिजे. तसेच विद्यार्थांनी विद्यार्थी दशेत शिक्षणच घेतले पाहिजे. तरुणांनी पैसा कमवला पाहिजे आणि वृध्दांनी भगवंताचे नामचिंतन केले पाहिजे असा मौलिक सल्लाही शेवटी त्यांनी दिला. यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, गायक, वादक, भाविक भक्त तसेच सुशी येथील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना बदाम सोमेश्वर पौळ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताह दरम्यान गावातील शेकडो स्वयंसेवक तरुणांनी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास कामांसाठी सुशीकरांकडून साडेपाच लाखांची देणगी सुपुर्द

श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासकामात दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे भाविकांच्या विविध सुख-सुविधांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. दरम्यान बीड शहरात साडेतीन एक्करमध्ये गोरगरिबांच्या मुलांसाठी होणाऱ्या भव्य दिव्य शाळा वास्तूच्या कामासाठी सुशी येथील भक्तगण मंडळी कडून साडेपाच लाख रुपयांची देणगी जमा केली. उर्वरित आणखी काही देणगी काही दिवसातच जमा करण्यात येणार आहे. याबद्दल महंत शिवाजी महाराज यांनी देणगीदारांचे आभार व्यक्त करुन ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या