27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर पकडले एक कोटी रुपये

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे. यामध्ये गेवराई पोलिसांना खामगाव चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करताना वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये पैसे असलेली लोंखडी पेटी आढळून आली. त्यामध्ये एक कोटी रुपयांची रोकड आढळली. ही रक्कम द्वारकादास मंत्री बँक संभाजीनगर शाखेतून बीडकडे जाताना पकडली. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधिताकडे नसल्याने अनेक संशय व्यक्त होत आहेत.

रक्कम निवडणुकीत वापरण्यासाठी तर नाही ना…?

लोकसभा निवडणुकीवर खामगाव येथे चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एस.एस.टी पथक खामगाव (ता. गेवराई जि.बीड) येथील पथकातील पो.कॉ. खांडेकर यांनी सांगितले की, वाहन तपासणी करत असताना खासगी वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये पैसे असलेली एक लोखंडी पेटी आढळून आली. त्यामध्ये एक कोटी रुपये मिळाले. याबाबत माहिती अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व पो.नि. गेवराई यांना माहिती देण्यात आली.

अधिक तपासामध्ये वाहन चालकाचे नाव प्रविण पांडुरंग चव्हाण (रा. उदंडगाव ता. जि.बीड) आहे. त्याला या प्रकरणाबद्दल विचारले असता त्याने सांगितले, या सदर एक कोटी रक्कम ही द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक शाखा बीड यांची असुन नमुद रक्कम ही छत्रपती संभाजीनगर शाखेतुन बीड येथे घेवुन जात असल्याचे सांगितले.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या