28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

लिंबागणेश येथे कडब्याची गंज जळाली ; पेटवून दिल्याचा संशय; महसूल व पोलीस प्रशासनाची घटनास्थळी भेट

गेवराई प्रतिनिधी, (महाराष्ट्र आरंभ):- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बांधकाम मिस्त्री सय्यद अयुब सय्यद अली यांच्या घराशेजारील ज्वारीच्या कडब्याची गंज मध्यरात्री जळाली.जवळपास लाईटची तार नसल्याने अज्ञाताने गंज पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला असुन यात त्यांचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असुन मंडळ अधिकारी अशोक डरपे, तलाठी गणपत पोतदार यांनी घटनास्थळी पाहणी करत स्थळपंचनामा केला असुन तहसिल प्रशासनाला कळवले आहे.नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,लिंबागणेश पोलिस चौकीचे बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली. दुष्काळाच्या दिवसात जनाव-यांच्या चा-याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला असताना याप्रकारच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

आज दि.०३ शुक्रवार रोजी मध्यरात्री सय्यद अयुब सय्यद अली यांच्या घराच्या पाठीमागील भिंती लगत पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या म्हशीच्या हंबरण्याने जाग आली असता त्यांनी घराच्या बाहेर येऊन पाहणी केली असता मोठा जाळ दिसला. त्यांची कडब्याची गंज पेटलेल्या अवस्थेत होती. पत्नी,मुलांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग विझली नाही.आगीत जवळपास १००० कडबा जळुन खाक झाला असुन त्याशेजारी असणा-या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांनी पेट घेतला.एकंदरीत ३० हजारांच्या जवळपास नुकसान झाले आहे. जवळपास विजेची तार नसल्याने सय्यद अयुब यांनी गंज पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला आहे. संबंधित घटनेची डॉ.गणेश ढवळे यांनी तहसीलदार सुहास हजारे व नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत गोसावी यांना कल्पना दिली.त्यानंतर मंडळ अधिकारी अशोक डरपे, तलाठी गणपत पोतदार यांनी घटनास्थळी भेट देत स्थळपंचनामा करुन तहसिल कार्यालयास अहवाल दिला. नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या