13.1 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीड : नेकनूर जवळील येळंबघाट रस्त्यावर तिहेरी अपघात; एक ठार

  1. ◼️बेकायदेशीर लाकडाचा व्यवसाय या अपघातास कारणीभूत ठरल्याचे नागरिकांतून चर्चा

बीड (महाराष्ट्र आरंभ):– नेकनूर परिसरातील येळंबघाट रस्त्यावर बुधवारी (दि.१) रात्री साडेआठच्या दरम्यान बोलेरो जीप- ट्रॅक्टर- टेम्पो असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले. येथे सुरू असलेला बेकायदेशीर लाकडाचा व्यवसाय या अपघातास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

नेकनूर परिसरात लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांनी येळंबघाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बस्तान बसवले आहे. या रस्त्यावर बुधवारी (दि.१) रात्री साडेआठच्या दरम्यान लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची बोलेरो जीपला (MH 26.V. 3402) जोरदार धडक बसली. या अपघातात बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यानंतर याच ट्रॅक्टरला ( MH16. f 7904 ) पाठीमागून आयशर टेम्पो (MH 24. AU.7885) धडक बसली. या अपघातात बोलेरो जीपमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. जखमींना नेकनूर रुग्णालयातील उपचारानंतर पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे. मृताचे नाव समजू शकलेले नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या