27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

वीस लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ ब्रास वाळूसह एक हायव असा एकूण २० लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हरिनाम भगवान मुंजाळ (रा. हिरापूर, ता.गेवराई) असे ताब्यात घेऊन कारवाई केलेल्या हायवा चालकाचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे यांची टीम (दि.२८ एप्रिल) रोजी रात्री बीड ते गेवराई जाणाऱ्या माहामार्गावर गस्त घालत असतात रात्री ९:३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना माहिती मिळाली की, गेवराई कडून MH.04.GF.9569 हा भारत बेंज कंपनीचा हायवा अवैधरीत्या वाळू भरून तो बीडकडे येत आहे. त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांच्या पथकाला महालक्ष्मी चौकात पाचारण केले असता, गेवराई कडून बीडकडे भरधाव वेगात येणारा हायवा थांबवून विचारपूस केली करून हायवा चालक हा गेवराई तालुक्यातील हिरापूर येथील असल्याचे समजले. सदरील वाळू ही त्यानी गोदावरी नदीपात्रातून चोरी करून आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सफौ. तुळशीराम जगताप यांच्या तक्रारीवरून त्या आरोपीविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी व ५ ब्रास वाळूसह हायवा असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल व पुढील तपास कामी बीड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, सफौ तुळशिराम जगताप, पोह पी.टी. चव्हाण, पोह विकास राठोड, पोह राहुल शिंदे, पोना बाळु सानप, चालक पोशि नामदेव उगले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या