गेवराई दि.२७ (महाराष्ट्र आरंभ):- बीड जिल्ह्यातील खालापूरी या ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई होती,येथील जनतेला शंभर दोनशे रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत असे,पुरता गाव या दुष्काळाला कंटाळला होता पण राजकीय गुलामीतून लोक सगळं निमूटपणे सहन करताना दिसले काही युवक भडकले काहींनी तीव्र भूमिका घेतली यातच सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी हंडा मोर्चा ग्रामपंचायत आणि मा.तहसील कार्यालयावर काढू अशी तिखट भूमिका घेताच दिलेल्या पाच दिवसाच्या आत गावात टँकर चालू झाले.ग्रामिन पेयजल योजना ,जलस्वराज्य योजना,पाणीपुरवठा योजना अश्या अनेक योजना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या चालू असून येथील पुढाऱ्यांना त्याची अंमलबजावणी पण होय नसेल तर आपापल्या संविधानिक पद सोडा असाही इशारा यावेळी डॉ जितीन वंजारे यांनी दिला होता याची गंभीर दखल घेत गावाला ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा चालू केल्या याबद्दल गावकऱ्यांनी आणि डॉ जितीन वंजारे यांनी आभार मानले.माझ्या मागणीला यश मिळाले पाण्याचे टँकर सुरू झाले त्याबद्दल धन्यवाद खालापूरी ग्रामपंचायत आणि सर्वच कर्मचारी
खालापूरी गावात पाण्याचा मोठा प्रश्न होता सप्ताह निमीत्त गावाकडे जाणार असल्यामुळे गावातील परिस्थितीचा आढावा घेतला असता गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असलेला दिसला त्यावर आवाज उठवला हंडा मोर्चा काढनार असल्याचे सांगताच गावात टँकर चालू झाले. धिम्म शासन-प्रशासन आणि ग्रामपंचायत वर कानात आवाज काढला की यंत्रणा जागी झाली काल गावात टँकर आले.मनोमन आनंद झाला छोट्या छोट्या गोष्टीची परिपूर्तता केली जात नाही त्यामुळे शासनाच्या योजना प्रभावीपणे गोर गरीबांपर्यंत पोहचत नाहीत हे आपलं दुर्भाग्य गावात सरपंच उपसरपंच सदस्य होन सोप्प आहे पण सामाजिक कार्य करण्याची उमेद पोटातूनच असावी लागते.गावात पाण्याचा भयंकर प्रश्न आजपर्यंत लांबवत ठेवला ही धीरगंभीर गोष्ट आहे पाण्याचं महापाप कोणीही करू नये.गावातील युवा,कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी आपल्या हक्क आणि अधिकार याकडे दुर्लक्ष करता कामा नये ……!
पाणी च नाही तर आपल्याला सगळा गाव सुजलाम सुफलाम करायचा आहे.शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवणार आहोत.माझी सत्ता असेल नसेल पण सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहू .कामाचा दर्जा पूर्णत्वाने १००% गुणवत्ता दर्शक करून घेऊ.बाकी सत्ता कोणाच्याही हातात असो लोकांच्या समस्स्यांचे निराकरण करण्यासाठी अर्ध्या रात्री मी मा.सम्राट डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर तत्पर असतो,आहे आणि भविष्यातही राहील.