27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा साठवून त्याची चोरटी विक्री करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची मोठी कामगिरी; ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गेवराई प्रतिनिधी, (महाराष्ट्र आरंभ):- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यांवर जास्तीत जास्त करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यावरून बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी अंमलदारांना मार्गदर्शन करून अवैध दारू विक्रेते, जुगार, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने (दि.२५ एप्रिल) रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पुस शिवारातील एका शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैधरीत्या गुटखा साठवून त्याची पान टपरी, किराणा दुकान व इतर ठिकाणी रात्री बे रात्री चोरटी विक्री करत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांच्या पथकाला तात्काळ त्या ठिकाणी रवाना करून पथकाने चोख कामगिरी बजावत (दि.२५ एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजता छापा टाकला असता. त्याठिकाणी सुभाष रामा सातलवाड (रा.भेडका ता.मुखेड जि.नांदेड हल्ली मुक्काम पुस, ता.अंबाजागोई) हा जागीच मिळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पत्र्याच्या शेडची पहाणी केली असता, त्यामध्ये १) राजनिवास सुगंधी पान मसाला २) v-1 तंबाखू गुटखा तसेच विमल पान मसाला गुटखा असा एकूण ६१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदरील हा गुटखा कुठुन आणला विचारले असता, त्यांनी सदरचा गुटखा हा गणेश मटेरियल अंबाजोगाई येथील मालकांनी दिला असल्याची कबुली दिल्याने पोलीस हवालदार विकास राठोड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात ९६/२०२४ कलम ३२८, २७२, २७३, ३४ भांदवी प्रमाणे बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, सफौ तुळशिराम जगताप, पोह पी.टी.चव्हाण, पोह विकास राठोड, पोह राहुल शिंदे, पोना बाळु सानप, चालक पोशि उगले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या