20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

गढी जवळील एका हाॅटेलवर पोलीसांनी धाड टाकून ८ हजार रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गेवराई पोलिसांची संयुक्त‌ कारवाई

गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गेवराई पोलिसांच्या सुयंक्ताने आज गुरुवार (दि.२५ एप्रिल) रोजी गेवराई तालुक्यातील गढी जवळील सह्याद्री हाॅटेलवर धाड टाकून देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकांसह गेवराई पोलीस पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत सुमारे ८ हजार ७०० रूपयांचा देशी‌ विदेशी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाड टाकून सह्याद्री हाॅटेलवर अवैध देशी दारू विक्री करणारे साईनाथ महादेव ढाकणे (वय २७) यांच्याकडून दारूचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी विकास कैलास वाघमारे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथक बीड व गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या