यामध्ये कुठलीही जिवीतहानी नाही..!
गेवराई (नवनाथ आडे):- सध्या बीड जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गारांचा पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. यातच आज मंगळवार (दि.२३) रोजी दुपारी ४:३० वाजता कोमलवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस चालू होता. त्यादरम्यान कोमलवाडी गावाजवळच असलेल्या एका बाभळीच्या झाडावर वीज पडली आहे. यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. वीज पडताच झाडाच्या शेंड्यापासून ते बुडापर्यत झाडाच्या धलप्या लांबपर्यंत गेल्या आहेत. ही घटना गेवराई तालुक्यातील कोमलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.