28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

लोकनेत्या मा. पंकजाताई मूंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा..

लोकनेत्या मा. पंकजाताई मूंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा..

-दत्तप्रसाद सानप

बीड (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम महायूतीच्या अधिक्रत उमेदवार, लोकनेत्या, मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून महायूतीचे हाथ बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे, जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तप्रसाद सानप यांनी केले आहे.

देशामध्ये लोकशाहीचा ऊस्तव चालू असून, बिड लोकसभा मतदारसंघात महायूतीच्या उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दि. 24/04/2024 रोजी दुपारी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात येणार आहे. सायंकाळी 6.00 वाजता भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभेमध्ये यूवक ह्रदयसम्राट मा. योगेश भैय्या क्षिरसागर साहेबांच्या माध्यमातुन हजारो मतदार बांधव सहभागी होणार आहेत.

देशामध्ये मा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी लाट आहे, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. बिड लोकसभा मतदारसंघात महायूतीच्या उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि भव्य प्रचार सभा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तप्रसाद सानप यांनी केले आहे..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या