एक कोटी २० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- गेवराई – बीड राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.२०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केली. या प्रकरणी तीन जणां विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून १ कोटी २० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायरा पेट्रोल पंपाजवळ अवैधरित्या वाळू घेऊन तीन हायवा चाललेले आहेत, अशी माहिती गेवराई पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने पाठलाग करून तीन हायवा ताब्यात घेतले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, सपोनि संतोष जंजाळ, पोउनि अशोक शेळके, पोउपनि शिवाजी भूतेकर, रामनाथ उगलमुगले, एएसआय सुरेश पारधी, संजय सोनवणे, शेखर हिंगावार यांनी केली.