28 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

पिकअप व दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भावाचा मृत्यू; एक जण गंभीर

उमापूर- शेवगाव रस्त्यावरील माऊली फाट्यावरील घटना

गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- उमापूर- शेवगाव रोडवर पिकअप व दुचाकीचा झालेल्या अपघातात सख्ख्या भावापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी एकाला उपचारासाठी संभाजीनगरला हलविले. हा अपघात आज (दि.२०) गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर झाला. मासे वाहतूक करणारा पिकअप व दुचाकीचा गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर अपघात झाला. यात उमापूर येथील रहिवासी दादासाहेब सांगुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश सांगुळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दादासाहेब यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथून सांगुळे बंधू आपली कामे आटोपून दुचाकीवरून (एमएच २३ व्ही एच ७७३२) उमापूरकडे जात होते. यावेळी तळणेवाडी आणि माऊली संस्थान बोरी पिंपळगाव फाट्यानजीक शेवगावकडून अंबडकडे जाणाऱ्या मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपची (जीतु एमएच २१ बी एच ५७३७) आणि दुचाकीचा अपघात झाला.

यावेळी भाजपचे शिवराज पवार घटनास्थळी तत्काळ हजर झाले. त्यांनी पोलीस स्टेशनला कळवून रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्याआधी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित घटनास्थळी दाखल झाले होते. गेवराई पोलीस दत्तु उबाळे, शेखर हिंगावर यांनी पंचनामा केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या