अकोला प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- अकोला-लोकसभेचे उमेदवार ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब यांना आज दिनांक 20 / 04 / 2024 रोजी त्यांच्या अकोला येथील निवासस्थानी जाऊन पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा यांचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला
यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष विजय नावकार ,अकोला जिल्हाध्यक्ष नरेश राऊत तसेच सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती
यावेळी पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पोलीस बॉईज असोसिएशनचे आभार मानले असून,संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना अतिशय चांगले काम करत असल्याचे सांगून , महाराष्ट्र पोलीसांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले
– प्रमोद तानाजी वाघमारे, संस्थापक अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य